वर्धा: अक्षय संजय थुल रा. उबदा यांनी त्याचे मालकीची होंडा एक्टीव्हा क्रमांक एम. एच. ३२ / ए.क्यु./०३९५ ग्रे रंगाची किंमत ५०,०००/- रूपये अशी दिनांक १७/०४/२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता दरम्यान नंदोरी चौक हिंगणघाट येथे हॅन्डल लॉक नं करता रोडवर उभी करून नाश्ता करण्यास गेले. नाश्ता करून गाडी जवळ परत आले असता सदरची गाडी मिळुन आली नाही. परीसरात भरपुर शोध घेतला असता गाडी मिळुन नं आल्याने कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे मालकीची वरील गाडी चोरून नेल्याचे तोंडी रिपोर्ट वरून अप क्रमांक ४४८/ २०२२ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
पो.स्टे. परीसरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीसंबंधाने तसेच झालेल्या चोऱ्यांची कार्यपदधती हेरून पोलीस निरीक्षक श्री. संपत चव्हाण यांनी तात्काळ दखल घेवुन गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो हवा. विवेक बनसोड यांचे पथकास योग्य मार्गदर्शन करून अनोळखी आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुशंगाने पो.हवा. विवेक बनसोड व त्यांचे पथकाने पो.स्टे परीसरात कसोशीने प्रयत्न करत व तात्काळ तपासचक्र फिरवुन संशयीत नामे अंगद राममिलन भारती वय ३० वर्षे रा. मुळपत्ता छपरा, पो.स्टे. धनकटा जि. संत कबीर नगर, उत्तर प्रदेश ह.मु. पांडुरंग वेले यांचे घरी, संत कबीर वार्ड, हिंगणघाट यास निष्णण केले. त्याचे जवळुन गुन्हयात चोरीस गेलेली होंडा एक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच. ३२ / ए. क्यु. / ०३९५ ग्रे रंगाची किंमत ५०,००० /- रूपये अशी जप्त केली. तसेच हिंगणघाट शहरातुनसुध्दा मोटारसायकली चोरीस गेल्या असल्याने आरोपीस पो.स्टे. परीसरात चोरीस गेलेल्या इतर मोटारसायकलींबाबत विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने काही दिवसांपुर्वी संत कबीर वार्ड हिंगणघाट येथील एका शाळे समोरील घराजवळ उभी केलेली मोटारसायकल सुध्दा चोरल्याचे सांगीतले वरून त्याचे जवळुन अप क्रमांक ४४५ / २०२२ कलम . ३७९ भादवि मधील एक होंडा सि.बी हॉरनेट १६० सि.सि. मोटारसायकल क्रमांक एम. एच. ३२ / ए.एन / ४८४० किंमत ७०,००००/- रूपये अशी सुदधा जप्त करण्यात आली. आरोपीचे ताब्यातुन एकुण १,२०,००० /- रूपयांचा मुददेमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले. पुढील तपास नापोकॉ पंकज घोडे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, यशवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संपत चव्हाण, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले आणी आशिष गेडाम यांनी केली.