आर्वी :-इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा आर्वीद्वारे शहरातील संजयनगर येथे घराला लागलेल्या आगीमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य तसेच जीवन उपयोगी वस्तू ची किट भेट स्वरूपात देऊन त्यांना मदत केली .
संजय नगरवासी मायाबाई भक्तराज गोसावी व राजपाल गोसावी यांच्या घराला बुधवार 13 रोजी अचानक आग लागली व या आगीमध्ये संपूर्ण घर ,घरातील अन्नधान्य अत्यावश्यक वस्तू, कूलर, पलंग जळून खाक झाली.
सामाजिक परिस्थितीची जाण असणाऱ्या व आर्वी आष्टी कारंजा तालुका मध्ये नैसर्गिक आपत्ती असो किंवा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा आर्वी चे संस्थापक व मार्गदर्शक डॉ अरुण पावडे यांच्या मार्गदर्शनात तात्काळ मदत करण्याकरता इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुढे येते.
घराला लागलेल्या आगीमुळे उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना तात्काळ इंडियन रेड क्रॉस सोसायटी आर्वी द्वारे अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तू भेट स्वरूपात देऊन मदत केली.
याप्रसंगी इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा आर्वी चे अध्यक्ष प्रा .ज्ञानेश्वर होले , श्री नंदकिशोर जी दीक्षित डॉ.अभिलाश धरमठोक, प्रा. अरुण ढोक, किशोर चोरडिया, दिनेश चोरडिया, हरदेव साठे, सुरेश खोंडे, नरेश करतारी, अनिश चोरडिया व इतर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.