फटाके वाहतूक करणारी ट्रक जळून खाक

 

#Khabardarmaharashtra, online news,latest news, social, sports, education, korona,crime#

 

सोलापूर : पुणे- सोलापूर महामार्गावर फटाक्याची वाहतूक करणारा ट्रक अचानक पेटला. बुधवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास आकुंबे ता- माढा गावाशेजारी ही घटना घडली. पाऊस सुरू असल्याने वीज पडून ही घटना घडली की अन्य काही कारणाने हे समजू शकले नाही. आग लागल्याचे समजताच चालकाने ट्रक बाजूला घेऊन उभा केला आणि तो ट्रकमधून उतरून लांब पळाला  ट्रकमध्ये फटाके असल्याने सतत फटाक्यांचे मोठे स्फोट  होत होते त्यामुळे कोणालाही जवळ जाता येत नव्हते. मोठ्या आवाजामुळे आकुंबे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.
एक मालट्रक फटाके घेऊन पुण्याहून सोलापूरकडे निघाला होता. आकुंबे शिवारत हा ट्रक पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास पोहोचला होता. या दरम्यान पाऊस विजांचा कडकडाट सुरू होता. अचानक ट्रकमधील फटाक्यांनी पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून  तेथून पळ काढला. अचानक ट्रकमधील फटाक्यांच्या आवाजामुळे  गावकरी व काही वेळानंतर पोलिस घटनास्थळी धावले. अपघात पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर महामार्ग पथकाचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन सोनार, हवालदार हाके, गणेश शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पण तोपर्यंत मालट्रकने संपूर्ण पेट घेतला होता. पोलिसांनी वरवडे टोल प्लाझा येथून पाण्याचा टँकर मागवून आग विझवीण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही . या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालट्रकसह लाखो रुपयांच्या फटाक्यांचे नुकसान झाले.