मोटरसायकल चोरी करणारा चोरटा जेरबंद

 

वर्धा: पुलगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लिंगुफैल येथे राहणारे राजु ठाकरे यांच्या घराजवळुन त्याची हिरोहोंडा पँशन प्रो. क्र. MH-32-S-3466 कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अशी तक्रार पोलीस स्टेशन, पुलगांव येथे प्राप्त असून त्याबाबत गुन्हा नोंद होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शैळेश शेळके यांनी गुन्हे प्रगटीकरण विभागाचे प्रमुख राजेंद्र हाडके यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रगटीकरण पथकाकडे वर्ग केला. सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुदेदमाल व आरोपीबाबत तपासचक्र फिरवून पथकाने अत्यंत शिताफीने गुप्त बातमीदाराकडुन माहिती प्राप्त करून लिंगुफैल, पुलगांव येथील अकबर अली जब्बार अली यास ताब्यात घेवून चोरीसंबधाने सखोल विचारपुस केली असता त्याने गाडी चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपीच्या ताब्यातुन चोरीस गेलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत सोळंखे, उविपोअ. गोकुळसिंग पाटील, पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन, पुलगाव येथील गुन्हे प्रगटीकरण विभागाचे प्रमुख राजेंद्र हाडके, संजय पटले, पंकज टाकोणे, शरद सानप, महादेव सानप यांनी केली असुन पुढील तपास करीत आहे.
पुलगांव पोलीसांच्या अथक प्रयत्नातून फिर्यादी राजु ठाकरे याने देवळी येथे कामाला जाणे येणे करिता कर्ज घेवून विकत घेतलेली मोटरसायकल परत मिळाली व चोरटा जेरबंद झाल्याने फिर्यादिच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. तसेच पुलगांव येथे ठाणेदार शैलेश शेळके जेव्हापासुन आले तेव्हापासुन कायद्याचे राज्य निर्माण झाले आहे. असा सुर पुलगांवच्या जनमाणसात ऊमटला आहे.
पोलीस तर त्यांचे काम कौशल्याने करणारच आहे. परंतू पुलगांवकरांनी त्याच्या ताब्यातील वाहन हे हँडल लाँक करून सुरक्षीत ठिकाणी ठेवन्याची खबरदारी घेण्याबाबत ठाणेदार शैलेश शेळके यांनी जनतेस आवाहन केले आहे.