पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची पुष्कर मेळाव्याला उपस्तिथी

 

 

 

गडचिरोली: जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता नदीच्या तीरावर प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या पुष्कर मेळाव्याला उपस्थित राहून प्राणहिता नदीचे मनोभावे पूजन केले.

बारा वर्षांनी आलेल्या या पुष्कर पर्वामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. आजपासून सुरू होणारा पुष्कर पर्व २३ एप्रिल २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित राहून भाविकांसाठी केलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. भाविकांच्या सोयीसाठी जागोजागी उभारण्यात आलेल्या महाप्रसाद वाटप केंद्रांना भेट देऊन भाविकांना पुष्कर पर्वाकरिता शुभेच्छा दिल्या. जिल्हा प्रशासनाने याठिकाणी येणाऱ्या भाविकांची उत्तम सोय केली असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उप-महानिरीक्षक संदीप पाटील, आमदार धर्मराव बाबा आत्राम, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुज तरे आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आणि पुष्कर पर्वात स्नान करण्यासाठी आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.