अविनाश रंगा मड़ावी नामक शैतानी नराधमाला फाशी दया.भामरागड पट्टी पारंपारिक गोटूल समितीची एकमुखी मागणी

 

#khabardarmaharashtra online news, latest news,social,politics,education,sport, korona,crime#

भामरागड: अविनाश रंगा मड़ावी या सैतानी नराधमाला फाशी देण्यात यावे या मागणीसाठी भामरागड पट्टी पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने भामरागड येथे आज 13 अप्रिल 2022 रोजी आन्दोल करण्यात आले. भामरागड पट्टी पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने भामरागड येथे भामरागड बंद व जनआक्रोश मोर्चाचे आवाहन करण्यात आले होते.मौजा भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या किनारी भव्य जाहिर निषेध सभा घेण्यात आली. या भव्य जाहिर निषेध सभेत लालसू नोगोटी, माजी जिल्हा परिषद सदस्य, गोई कोडापे, माजी सभापती, पं. स. भामरागड, नीलेश वेलादी, सरपंच, ग्राम पंचायत, मेडपल्ली, प्रमोद आत्राम, माजी सरपंच, ग्राम पंचायत, पेरमिली, बालाजी गावड़े, सरपंच, ग्राम पंचायत, कोरेपल्ली, अशोक गायकवाड़, नगरसेवक, न. पं. भामरागड, कृषी मित्र सीताराम मड़ावी, पीड़ित मुलीचे आई व वडील, ईश्वर परसलवार, अध्यक्ष, भामरागड तालुका पत्रकार संघ, चिन्ना माहाका, सामाजिक कार्यकर्ता हे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर जाहिर निषेध सभेत भामरागड तालुक्यातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते. उपस्थित सर्व जनतेने मौजा गेर्रा टोला (मन्नेराजराम) येथे अमानवीय प्रकारे बलात्कार करून हत्या केलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केले. व बलात्कार करणारा अविनाश रंगा मड़ावी व त्याला या गुन्हात मदत करणाऱ्या सर्व आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी अशी एकमुखी मागणी या जाहिर निषेध सभेत करण्यात आले. तहसीलदार अनमोल कांबळे स्वतः आन्दोलनस्थळी येऊन पीड़ित कुटुंबीयांच्या वतीने निवेदन स्विकारले.
मौजा गेर्रा टोला (मन्नेराजाराम), तालुका भामरागड, जिल्हा गडचिरोली येथे घड़लेल्या घटनेचे सविस्तर वृत्त ज्याप्रमाणे आहे की, कुमारी मीना एर्रा सिडाम या मुलीचा जन्म गेर्रा टोला, तालुका भामरागड, जिल्हा गडचिरोली येथे दिनांक २ मार्च २००४ रोजी झाला होता. मीनाचे आई वडील अत्यंत गरीब असून हालाकीचे जीवन जगत आहेत. मीनाच्या डोळ्यात तिच्या आई वडिलांनी आपले सुखी जीवनाचे स्वप्न बघितले होते. मीनाला उच्च शिक्षित करून वकील बनविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. म्हणून मीनाच्या आई वडिलांनी मीनाला मैगसेसे अवार्ड विजेते तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे शिकायला पाठविले. ती लोक बिरदारीत बालवाड़ी ते १० वी पर्यंत शिक्षण घेतली. शालेय अहवालानुसार मीना अत्यंत हुशार व प्रामाणिक होती. १० वी नंतर ती पुढील शिक्षणाकरीता राणी दुर्गावती विद्यालय, अलापल्ली येथे प्रवेश घेतला. मीनाची ही प्रगती गावातीलच सरपंचाचा मुलगा नामे अविनाश रंगा मड़ावी मुलाला बघवत नव्हता. १७ वर्षीय मीनाला प्रेमाच्या जाळात फसवून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. त्यातून मीना गरोदर राहिली. मीना जेंव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आली तेंव्हा मीनाच्या आईला मीना गरोदर असल्याचे चुनुक लागली होती. राक्षसी प्रवृत्तीच्या अविनाश रंगा मड़ावी याला आपल्या संबंधातून मीना गरोदर आहे याची माहिती झाली होती. मीनानेही अविनाश रंगा मड़ावी याला आपल्या प्रेमाचे प्रतीक तिच्या पोटात वाढत असल्याचे सांगितले होते. अविनाश रंगा मड़ावी याने मीनाव्यतिरिक्त अन्य मुलीनाही लग्नाचे आमिशन दाखवून बलात्कार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मीना गरोदर होती म्हणून तिला संपविण्याचे कट त्यांनी रचला. मीनाची हत्या करण्यापूर्वीच त्यांनी जमिनीवर खड्डा खोदून ठेवला. दिनांक २९ मार्च २०२२ च्या रात्री जेंव्हा मीना गावातीलच एका लग्न समारंभात होती, तेंव्हा अविनाश रंगा मड़ावी या नाराधमाने मीनाला जबरदस्तीने गावालगतच्या नाल्याजवळील शेतावर नेऊन अनेक वेळा बलात्कार केला. बलात्कार करून दगड़ डोक्यावर आपटून मीनाची निर्घ्रुण हत्या केली. हे अमानवीय व राक्षसी कृत्य अविनाश रंगा मड़ावी या नराधमाने केला. या अमानवीय व राक्षसी कृत्य करण्यास अविनाश रंगा मड़ावी याला घरातील अन्य सदस्यांनी मदत केली. अविनाश रंगा मड़ावी याचे वडील रंगा मड़ावी याचाही सदर हत्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग होता. हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्टपणे दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार आदिवासी समुदायासाठी कलंक आहे. आदिवासी समुदायात बलात्कार, चोरी, फसवणूक होत नाहीत. आदिवासी माणूस कधीही भीक मागत नाहीत. परंतू हल्लीच्या काळात बलात्कारसारखे गंभीर गुन्हे आदिवासी समुदायातही होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे गुन्हेगारावर कठोर शिक्षा होत नाहीत. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळत आहे. म्हणून भारतीय न्यायव्यावस्थेने अविनाश रंगा मड़ावी व गुन्हात सहभागी असऱ्या रंगा मड़ावीसहित सर्व आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी. व मीना एर्रा सिडाम या पीड़ित कुटुंबाला न्याय द्यावे. ही मागणी सदर जाहिर निषेध सभेत करण्यात आले.