पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून पतीने घेतली गळफास

 

 

वर्धा: शुल्लक कारणावरून पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे कि यातील जखमी महिला सौ मंगला सुरेश चांगोले वय 38 वर्ष व आरोपी सुरेश रामचंद्र चांगोले वय 40 वर्ष हे पत्नी पती असून आरोपी हे जखमीला घरगुती कारणावरून शिवीगाळ करीत असतात. दि.11/04/2022 रोजी सकाळी 10/00वा. चे सुमारास त्यांचे राहते घरी इंदिरा नगर आष्टी घरातील घरगुती कारणावरून आरोपी याने कुर्‍हाडीने पत्नीच्या डोक्यात 2वार करून गंभीर जखमी केले होते यातील जखमी महिलेचा भाऊ अंकुश काशिनाथ राऊत यांचे तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा नोंद क्रमांक 83/2022 कलम307,504 भा द वि नोंद करून तपासात घेतला.
आरोपी शोध चालू असताना पोलीस स्टेशन तळेगाव अंतर्गत मौजा भारसवाडा शेत-शिवार परिसरात नमूद आरोपित याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे आज दिनांक 12/04/22 रोजी 08:00वाजता दिसून आले आहे आत्महत्या चौकशी पोलीस स्टेशन तळेगाव पुढील तपास करीत आहे