बार्टीच्या समतादूत मार्फत समाजकल्याण योजनांचा पथनाट्यातून प्रचार व प्रसार

 

 

कारंजा:  सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती राज्यभरात (दि. 06) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या समतादूत प्रकल्पाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती मोहोत्सवा निमित्ताने समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आणि याच समता सप्ताहाचा भाग म्हणून आज बस स्थानकावर सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने योजना आपल्या द्वारी या पथनाट्यातून प्रबोधन करण्यात आले. सर्वात प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा येथे महामानवांना मानवंदना वाहण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आष्टी समतादूत विनायक भांगे यांनी केले . तर आर्वी येथील समतादूत बंश्री परतेती यांनी गीत गायनातून प्रबोधन केले ,तर समतादूत सिद्धार्थ सोमकुवर यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी पथनाट्य सादर करून उपस्थितांना प्रबोधन केले तर उपस्थितांना भारतीय संविधानाची प्रस्ताविका भेट देण्यात आली.वर्धा जिल्हा प्रकल्प अधिकारी दिनेश बारई यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्यात समता सप्ताह साजरा केला जात आहे.