गांधी विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

 

 

वर्धा: स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालयात आज दिनांक 11 एप्रिल रोजी प्रभारी मुख्याध्यापिका शुभांगी ताई रिधोरकर यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिबा फुले जयंती चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये श्री पायले सर ,श्री बोडके सर श्रीमती अजमेरे मॅडम ह्या प्रमुख उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांमधून पवन गोमासे भावना नेहारे तेजस्विनी दुबे आणि एन सी सी सीएचएम मोहित गिरी याने विचार व्यक्त केले .तसेच शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव अध्यक्ष माननीय प्रभारी मुख्याध्यापिका शुभांगी ताई रीधोरकर यांनी केला. एनसीसी छात्र सैनिकांनी कार्यक्रमानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळ्यास मानवंदना दिली. कार्यक्रमाचे संचालन एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे तर चौधरी सर यांनी आभार प्रदर्शन केले.