वर्धा: हकीकत याप्रमाणे आहे की, नामे सौ. पुनमकौर खुनसिंग बावरी वय 44 वर्ष रा. सरदार मोहल्ला वार्ड क्र. 09 जुना पुलगाव ता.देवळी जि.वर्धा यांनी दिनांक 08/04/2022 रोजी पो.स्टेला तोंडी रिपोर्ट दिला की दि.06/04/2022 चे रात्री 09/00 वा ते दि. 07/04/2022 चे सकाळी 06/30 वाय सुमारास बकरा घराचे मागील बाजुस मोकळ्या जागेत बांधुन असलेला एक काळ्या रंगाचा बकरा अंदाने किं. 12000/- रु चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने रात्र दरम्याण चोरुन नेला आहे, अशा फिर्यादी हिचे तॉडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात आहे.
सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक श्री. शैलेश शेळके साहेब यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अमंलदार स.फौ. खुशालपंत राठोड पो.ना.महादेव सानप, जयदीप जाधव, मुकेश वांदिले हे तपास करीत असतांना पो.स्टे. हद्दीतील सराईत गुन्हेगाराना ताब्यात घेवुन विचारपुस करुन मुखबिर मार्फत प्राप्त माहीती वस्न आरोपी अजय अरुण मारगाये वय 24 वर्ष रा. वार्ड क्र. 09 नदिफैल पुलगाव ता.देवळी जि. वर्धा यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातुन 1) एक काळ्या रंगाचा बकरा अंदाजे कि. 12,000/- रु. 2) गुन्हयात दोर कापण्यासाठी वापरलेला एक स्टिल चाकु कि. 20/-रु. असा एकुण जु.की. 12020 /-रु.चा माल हस्तगत करून अवघ्या 06 तासाचे आत गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत होळकर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव श्री. गोकुळसिंग पाटील यांचे मार्गदर्शनात श्री. शैलेश शेळके पोलीस निरीक्षक पो.स्टे. पुलगाव यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरणाचे अंमलदार स.फौ. खुशालपंत राठोड, नापोकों. महादेव सानप, जयदिप जाधव, मुकेश वांदिले यांनी केली आहे.