युवा पिडीची पहिली पसंद शिवसेना जारावंडी येथील युवकांचे शिवसेनेत प्रवेश

 

 

एटापल्ली :- आज दिनांक ०८/०४/२०२२ रोजी जरावांडी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री शारिफ खान पठाण व श्री शाकीर पठाण यांचं एटापल्ली येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे श्री मनीष भाऊ दुर्गे शिवसेना तालुकाप्रमुख एटापल्ली तसेच अक्षय भाऊ पुंगाटी युवासेना तालुकाप्रमुख एटापल्ली यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी फॉर्म भरून शिवसेनेत जाहीर प्रवेश झाले. एटापल्ली तालुक्यातील जरावांडी क्षेत्र हा खूप मोठा क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रातील विकास कामाकरिता युवा पिढीला समोर यावं लागेल. आणि येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा हा त्या क्षेत्रामध्ये फडकलाच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टी लक्षात घेता शिवसेना युवासेना तालुका प्रमुख यांनी शिवसेनेची जी संकल्पना आहे ती मनात घेऊन ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ या पद्धतीने काम हाती घेतलेला आहे. जनतेच्या सेवेसाठी आणि अहेरी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी तळागाळात जाऊन शिवसैनिक सदैव काम करत राहील. याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख सलीम भाई शेख,सुमित खन्ना युवासेना शहर प्रमुख,नेहाल कुंभारे युवासेना उपशहर प्रमुख,पवन कुळसंगे शाखाप्रमुख प्रभाग क्र.15 उपस्थित होते.