शिवसेनेतर्फे आलापल्लीत तीव्र निषेध नोंदवण्यात आला

 

आलापल्ली:विक्रांत या युद्धनौकेसाठी जमा केलेला पैसा राजभवनात न पोहोचता तो किरीट सोमय्या व त्याचा मुलगा नील सोमय्या यांनी परस्पर स्वतःच्या निवडणुकीसाठी व बांधकाम व्यवसायात वापरला.’ याबाबत मुंबई येथे किरीट सोमय्या व त्यांचा मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच श्री.माननीय संजय राऊत यांच्यावर खोटी कार्यवाही करणाऱ्या ई.डी. व भाजपा सरकारचा तसेच किरीट सोमय्याच्या जाहीर तीव्र निषेध करण्यात आला आणि त्यांना ताबडतोब अटक करावी या मागणीसाठी ०७ एप्रिल रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा क्षेत्र श्री. माननीय रियाज भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक आणि युवासैनिकांनी आलापल्ली येथील मुख्य रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आंदोलनादरम्यान किरीट सोमय्या यांना अटक करा,भाजप सरकार हाय हाय असे नारे देऊन आलापल्ली येथील परिसर दणाणून सोडले. याप्रसंगी अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख रियाजभाई शेख, अरुण धुर्वे साहेब शिवसेना उपजिल्हाप्रमुख,बिरजू गेडाम अहेरी विधानसभा संघटक, युवासेनेचे जिल्हा अधिकारी दिलीप भाऊ सुरपाम,युवती जिल्हाप्रमुख अहेरी तुळजा ताई तलांडे, अहेरी तालुका उपसंघटीका सपनात ताई ईश्वरकर,अहेरी ग्रामीण तालुका प्रमुख प्रफुल भाऊ येरणे, अक्षय करपे शिवसेना अहेरी तालुकाप्रमुख, शिवसेना तालुकाप्रमुख एटापल्ली मनीष भाऊ दुर्गे, युवा सेना तालुका अधिकारी अक्षय भाऊ पुंगाटी, शिवसेना तालुकाप्रमुख मुलचेरा गौरव बाला,शिवसेना शहर प्रमुख मुलचेरा दीपक बिश्वास,शिवसेना नगरपंचायत अध्यक्ष मुलचेरा विकास भाऊ नैताम,युवा सेना तालुका प्रमुख मुलचेरा राजेश गुंतीवार, प्रशांत नसखुरी सिरोंचा युवासेना तालुका अधिकारी, खुशाल मडावी शिवसेना तालुकाप्रमुख भामरागड,दिनेश मडावी भामरागड युवासेना तालुका अधिकारी, पौर्णिमाताई ईष्टाम, मनीष ईष्टाम,अजय संगमवार युवासेना तालुका अधिकारी,शिवसेना विभाग प्रमुख सलीम भाई शेख, शिवसेना उपतालुका प्रमुख दल्लु पुसली, युवा सेना शहर प्रमुख सुमित खन्ना,युवा सेना उपशहर प्रमुख नेहाल कुंभारे, शाखाप्रमुख एटापल्ली टोला तेजा भाऊ गुजलवार,कृष्णार शाखाप्रमुख पवन भाऊ कुळसंगे, सुजल वाघमारे,विवेक ओढपल्लीवार, मोहित दुर्गे, अंकित मांडवकर, वीरेंद्र दूर्वा, शशांक दहागावकर, यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, युवती सेनाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.