बाळा जगताप यांच्या मध्यस्थी ने मासेमाऱ्यांचे उपोषण मागे येत्या 12 तारखेला बच्चू कडू यांच्या संबंधित विभागसोबत मंत्रालयात बैठक

 

धीरज कसारे //तालुका प्रतिनिधी

कारंजा:- गेल्या 4 दिवसापासून कारंजा येथील तहसील कार्यालया समोर सुरू असलेले उपोषण आज प्रहार चे नेते बाळा जगताप यांच्या मध्यस्थी ने उपोषण मागे घेण्यात आले आहे कारंजा येथील कार नदी मत्स्य व्यवसाय संस्थे च्या सभासदणी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते शासनाच्या निर्णयानुसार कोरोना काळात मासेमारणा सहा महिन्यांची मुदत वाढ मिळून सुद्धा कारंजा तालुक्यातील खैरी कार नदी प्रकल्प येथे संस्थेला वाढीव मुदत न मिळयाने वारंवार पत्रव्यवहार व निवेदने देऊन सुद्धा निर्णय न लागल्याने अखेर मासेमाऱ्यांनी तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू केले होते आज चौथ्या दिवशी प्रहार चे विधानसभा प्रमुख बाळा जगताप यांनी भेट देऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या शी उपोषणकर्त्यांची फोन वर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले असून येत्या 12 तारखेला संबंधित विभागासोबत मंत्रालयामध्ये बैठक लावण्याचे आश्वासन देण्यात आले असून त्यानंतर मासेमार संस्थेच्या सभासदांना सरबत पाजून हे उपोषण मागे घेण्यात आले आहे यावेळी कारंजा येथील तहसीलदार ऐश्वर्या गिरी, नगराध्यक्षा स्वाती भिलकर, ठाणेदार दारासिंग राजपूत माजी पंचायत समिती सदस्य टीकाराम घागरे ,नगरसेवक कमलेश कठाने, नगरसेवक हेमंत बन्नगरे अतुल वरगंटीवार, सहहयक आयुक्त मत्स्यव्यवसाय वर्धा,दिनेश खोपे, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, पद्माकर बसवन्त,सहायक मत्स्यव्यवसाय अधिकारी वर्धा यांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडविण्यात आले आहे