आर्वी परिसरातील पोलिसांचा सुव्यवस्था रूट मार्च काढण्यात आला

 

आर्वी , प्रतिनिधी/ उमंग शुक्ला

आर्वी : पोलीस स्टेशन आर्वी हद्दीत श्रीराम नवमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत पार पाडावे याकरिता रूट मार्चच आयोजन करण्यात आले होते. हा रूट मार्च पोलीस स्टेशन आर्वी पासून सुरु करून छत्रपती शिवाजी महाराज चौक,गांधी चौक ,औलिया मस्जिद,
श्रीराम मंदिर, मायबाई वार्ड, दगडी फुल तसेच परत आर्वी पोलीस स्टेशन पर्यंत रूट मार्च काढण्यात आला होता.
तसेच या रूट मार्च मध्ये पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर, पोलीस सहनिरीक्षक वंदना सोनूने, पोलीस उपनिरीक्षक हर्षल नगरकर, 20 अमलदार, लाटी, ढाल, हेल्मेट, रायफल सह व 14 सैनिकांचा सहभाग होता.