संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत ग्रामपंचायत काचनगाव येथे
जिल्हास्तरीय तपासणी पथकाने पाहणी केली.
पथकात श्री सत्यजित बडे साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि प वर्धा,
श्री पाठक साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी व श्रीमती इंगळे मॅडम जिल्हा समाजकल्याण अधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम पाहुण्यांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले व नंतर ग्राम पंचायत ने गावात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची व स्वच्छतेची माहिती घेत शाळेला भेट देऊन शाळेबद्दल माहिती घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व नंतर स्मशानभूमीला भेट दिली व स्मशानभूमी येथे मोक्षधाम फलकाचे अनावरन करुन वृक्षारोपण करत कार्यक्रमास सांगता दिली.
यावेळी कार्यक्रमास सरपंच तानबाजी तळवेकर उपसरपंच प्रमोद कापसे ग्रा पं सदस्य तथा माजी सरपंच अंकुशराव कापसे ग्रा पं सदस्य हनुमान साखरकर ग्रामसेवक तपासे साहेब आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका गावकरी उपस्थित होते …..