रेडे तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले जेरबंद लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

#khabardarmaharashtr, online news, politics, social, corona, crime#

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे कि,पोलिसांना मुखबीर कडुन मिळालेल्या खात्रीशिर खबरेवरुन नमुद पंच व पो. स्टॉप चे मदतीने दारोडा टोल प्लाझा येथे नाकेबंदी करुन खबरेप्रमाणे मिळालेल्या माहितीवरुन कंटनेर क्र. आर जे. 14 जि.एल. 1596 चे चालक व त्याचे सहकारी यांचे ताब्यातुन कंटनेर मध्ये लहान मोठे 20 नग जनावरे (हल्ले ) हे कोंबुन असलेल्या अवस्थेत नाकपुड्यांना दोरी बांधुन असलेल्या स्थितीत जनावरे म्हशीचे रेड नर जातीचे 20 नग हे निर्दयतेने व क्ररुपणे कोंबुन त्यांना चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता क्रुरतेने वाहतुक करित असतांना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन 1) कंटनेर क्र आर जे. 14 जि.एल. 1596 कि. 18,00,000रु.02)20 नग

म्हशीचे रेडे नर जातीचे प्रती नग अंदाजे कि. 20,000 रु. प्रमाणे एकुन कि, 4,00,000रु, (3) एक मोबाईल ईनफेक्स कंपनीचा काळ्या पांढ-या रंगाचा मोबाईल कि. 3,000 रु. ( 4 ) एक विवो कंपनीचा निळ्या रंगाच्या बाँडीचा मोबाईल कि, 10,000 रु. ( 5 ) एक टेक्नो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल कि 2500 रु. ( 6 ) पांढ-या रंगाचा सँमसंग कंपनीचा मोबाईल कि, 1,000 रु(7) काळ्या रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल कि. 5,000 रु.चा व आरोपीतांचे अंगझडतीतुन नगदी 50,630 रु. असा एकुन जु. कि 22, 72,130 रु. चा माल मिळुन आल्याने मोक्काजप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सा. पोलीस अधिक्षक कार्यालय, वर्धा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सा. पोलीस अधिक्षक कार्यालय, वर्धा, मा. उप विभागीय पोलीस अधीकारी सा. वर्धा उप विभाग वर्धा, मा. उप विभागीय पोलीस अधीकारी सा. उपविभाग हिंगणघाट, मा. पोलीस निरीक्षक सा. श्री. राजेन्द्र शेटे सा. व पो.उप.नि. राजु सोनपितरे सा. यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज धात्रक, पोलीस हवालदार अमित नाईक, अमोल खाडे, ना. पो. शि. रंजित फाले करित आहे.