हिंगणघाट ची मयुरी नव्हाते दिसणार मराठी चित्रपठात प्रेम लागे जिवा चित्रपठ येत्या २२ एप्रिल रोजी प्रदर्शित

 

 

हिंगणघाट : शहरातील मयुरी नव्हाते हिने मराठी चित्रपटात अभिनय केला. हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रातील चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री मयुरी नव्हाते हिचा अतुल वांदिले यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला आहे.
शहरातील साधारण कुटुंबात वाढलेली मयुरी ही प्रमोद नव्हाते यांची मुलगी आहे. मयुरीचा मराठी चित्रपट ‘प्रेम लागे जिवा’ हा येत्या दि.२२ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.
आधार फाउंडेशन द्वारा आयोजित माँ राणी कला महोत्सव २०१७ मध्ये मयुरी नव्हाते नी पहिल्यांदा नाटक सादर केले होते. टिक-ट्वाक अँपच्या माध्यमातून ती व्हिडिओ करत होती. मयुरीला दिल्ली येथे अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. त्यानंतर तिला साऊथ मध्ये शॉर्ट चित्रपटात काम मिळाले. साऊथमध्ये ‘दास गँग’ व मराठी मध्ये ‘रांगडा’ मध्ये मुख्य नायिका म्हणून काम केले आहे. ‘प्रेम लागे जिवा’ मराठी चित्रपटामध्ये तिने सहअभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या दि.२२ एप्रिल ला संपूर्ण महाराष्ट्रात मध्ये प्रदर्शित होत असून यानिमित्ताने मयुरी नव्हाते यांचा निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले यांनी तिचा सत्कार करून तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सुधाकर वाढई उपस्थित होते