भामरागड : युवासेना प्रमुख नामदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना सचिव वरून सरदेसाई मा रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल डिझेल गॅस खाद्यतेल डाळी अश्या अनेक वस्तूंचे दर दररोज वाढत आहेत गोरगरीब जनतेला जगणे मुश्किल झाले आहे .
इंधन दर वाढ करून माहागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या कष्ट कमाईवर दरोडा घालणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार राहिलेले नाहीं म्हणून वाढत्या महागाई बद्दल केंद्र सरकारचा अभिनंदन करण्यासाठी थाळी वाजवून भामरागड येथे आंदोलन करण्यात आले या वेळी खुशाल मडावी शिवसेना तालुका प्रमुख, गजानंद उईके शहर उपप्रमुख तथा नगरसेवक, दिनेश मडावी युवासेना तालुका प्रमुख, प्रकाश आत्राम, स्वप्नील गावडे, चंपत मडावी, विक्की मरस्कोले, बाबूं मडावी,दलसू कुळयामी, प्रीतम मडावी,उमेश वेलादी,रवींद्र उईके,महेश गुडीपक्का, कु,पूजा सडमेक, कु,तृप्ती इष्टाम, चित्तरंजन बाला, विशाल मडावी,जय मडावी, व अनेक युवासेना सैनिक उपस्तिथ होते