समुद्रपुर: गुढिपाडव्याचा रात्री ८ वाजताच्या सुमारास
समुद्रपुर तालुक्यातील नागरिकांनी आकाशातून उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत आहे.धामणगाव व वाघेडा या दोन गावातील शेतशिवारात अवकाशातून पडलेले अवशेष आढळून आले आहे.यामुळे सर्व चर्चांना उधाण आले आहे.नेमना रात्री आकाशात दिसणारा प्रकार त्यांनर जमिनीवर पडलेले हे अवशेष हा काय प्रकार आहे.याच संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. नितीन सोरते हे सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांना एक सिलेंडर सारखी आकृती असणारी काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेली वस्तू अंदाजे 3 ते 4 किलो वजनाची आढळून आला त्यांनी लागलीच या संबंधी समुद्रपुर पोलिस ठाण्याला माहिती दिली पोलिस उपनिरीक्षक राम खोत यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी जाऊन हे अवशेष ताब्यात घेतले.तर धामणगाव येथील शेतकरी भाऊसाव ननावरे यांच्या गावा शेजारच्या शेतामध्ये सकाळी अवशेष आढळून आले यावेळी गावातील नागरिकांनी हे अवशेष बघण्यासाठी एकच गर्दी केली सदर घटनेची माहिती पत्रकार गजानन गारघाटे यांना मिळताच त्यांनी या संबंधी गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांना कळविले ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन सदर अवशेष ताब्यात घेतले आहे.या संबंधी पुढील तपास पोलीस करीत आहे.मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले असून कोणत्याही नागरिकांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी नागरिकांना केले आहे.