अहेरी तालुका प्रतिनिधि // इरफान शेख
अहेरी:- नजीकच्या चिंचगुंडी ग्राम पंचायत येथे 15 वित्त आयोग योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आशाताई पोहणेकर, सरपंच कमला आत्राम, उपसरपंचा सुशीला कस्तुरवार तसेच ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
चिंचगुंडी येथे पिण्याच्या पाण्याची नेहमी पायपीट व टंचाई राहत होती आता पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सुटणार असून 15 वित्त योजनेतून प्रत्येकाच्या घरी पाणी पोहचणार आहे.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी, प्रत्येक गाव खेड्यात शिक्षण, सिंचन, आरोग्य पोहचले की, गाव विकासाच्या वाटचालीकडे मार्गक्रमण करीत असते, असे म्हणत आमदार धर्मराव बाबा आत्राम हे आधीपासूनच नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी झटत असून आता चिंचगुंडी वासीयांचे पाण्याची समस्या कायमची सुटणार असल्याने आपणाला आनंद व समाधान होत असल्याचे म्हटले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, रमेश कस्तुरवार, शंकर पानेम, लक्ष्मण तोटावार, कपिल पानेम, श्रीकांत बोल्ली, व्यंकटेश येदनूरवार, तिरुपती रायदंडी होते.