गोंडपिपरी येथे रक्तदान शिबिर  समाजकार्य महाविद्यालय चंद्रपूर व चिंतामणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

 

    गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी निकेश बोरकुटे

 

गोंडपिपरी:-

सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर व चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिपरी

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ,व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 11 एप्रिल रोज रविवारला स्व.लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय गोंडपीपरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गोंडपिपरी चे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा. संदीप धोबे, गोंडपिपरी शहर विकास आघाडी संस्थापक अध्यक्ष महेंद्रसिंह चंदेल, गोंडपिपरी यंग ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष सुरज माडूरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. रक्तदान शिबिरात सहभाग घेतलेल्या रक्तदात्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते

शाल ,श्रीफळ व प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात आला.