देसाईगंज शहरात सोशल डिस्टेनसिंग चा फज्जा प्रशासनाचे दुर्लक्ष

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // शुभम खरवडे

देसाईगंज :कोरोनाच्या महामारी मुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन केले आहे, कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आठवडी बाजार संपूर्ण दुकाने 30 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत, देसाईगंज मध्ये आज 18 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत, शनिवार ते रविवार दोन दिवस संपूर्ण लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे तरी देसाईगंज मध्ये अनेक वॉर्डांमध्ये चिकन,मटन,मच्छी चे दुकाने चालू करुन लोक विक्री करत आहेत, आदेशाचे पालन न करता ग्राहक विना मास्क, सामाजिक अंतर न ठेवता गर्दी करत आहेत यामुळे लोकांचे जीव धोक्यात आहेत असे दिसून येते, तरी यावर देसाईगंज नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे असे दिसून येते.