गडचिरोली जिल्ह्यात सहा मृत्यूसह आज 296 नवीन कोरोना बाधित तर 102 कोरोनामुक्त

 

 

  अहेरी तालुका प्रतिनिधी // इरफान शेख

 

गडचिरोली, दि.11: आज जिल्हयात 296 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 102 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 12396 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10687 वर पोहचली. तसेच सद्या 1576 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 133 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज सहा नवीन मृत्यूमध्ये आरमोरी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये ता.ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील तीन पुरुषाचा समावेश असून एकाचे वय 62 वर्ष, दुसऱ्या व्यक्तिचे वय 37 वर्ष व तिसऱ्या व्यक्तिचे वय 54 वर्ष होते. व चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर येथील 54 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच गडचिरोली तालुक्यातील मानसिक आजाराने ग्रस्त 6 वर्षीय बालकाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.21 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 12.71 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.

नवीन 296 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 114, अहेरी तालुक्यातील 41, आरमोरी 19, भामरागड तालुक्यातील 12, चामोर्शी तालुक्यातील 18, धानोरा तालुक्यातील 15, एटापल्ली तालुक्यातील 6, कोरची तालुक्यातील 28, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 15, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 18 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 102 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 54, अहेरी 11, आरमोरी 11, भामरागड 7, चामोर्शी 6, धानोरा 4, मुलचेरा 2, कुरखेडा 2, तसेच वडसा 5 येथील जणाचा समावेश आहे.

काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील – जिल्हयातील शासकीय 68 व खाजगी 2 अशा मिळून 70 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज 2010 व दुसरा डोज 185 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 46992 तर दुसरा डोज 11103 नागरिकांना देण्यात आला आहे.