टीपागढ़ डी वी सी किशोर उर्फ गोंगलू उर्फ सोबू घिसू कवड़ो याला पकड़न्यात पोलिस पथकाला यश

 

        प्रतिनिधि // दीक्षा झाड़े

29 मार्च रोजी खोब्रामेंढा-हेटाळकसा येथे झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीमध्ये जखमी झालेल्या नक्षलवादी टिपागड डिव्हिसी किशोर ऊर्फ गोंगलु ऊर्फ सोबु घिसु कवडो वय 38 वर्ष रा. रामनटोला ता. एटापल्ली यास पकडण्यात पोमके कटेझरीच्या पोलीस पथकाला यश प्राप्त झाले असुन खोब्रामेंढा चकमकीदरम्यान त्यास बंदुकीची गोळी लागली असल्याने तो जखमी अवस्थेत पडून होता. पोलीस पथकाने त्याला पकडल्यानंतर रुग्णालयात दाखल केले असुन, रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया होवुन त्यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

 

त्याचा चकमक, खून, जाळपोळ अशा अनेक गुन्हयात सहभाग असल्यामुळे त्याच्यावर गडचिरोली पोलीस दल पुढील कारवाई करणार आहे. त्यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या विरोधात विघातक कृत्य करणाऱ्या नक्षलवाद्यांना व जखमी नक्षल कमांडर किशोर कवडो यास मदत करणारा नक्षल समर्थक गणपत कोल्हे यालादेखील गडचिरोली पोलीस दलाने अटक केली असुन पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन, नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.