क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन जयंती निमित्य आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी नमन केले माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम उपस्थित होते

 

अहेरी तालुका प्रतिनिधी इरफान शेख

अहेरी:– क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य रविवार 11 एप्रिल रोजी लॉकडाऊन मुळे राजवाड्यातच प्रतिमेसमोर अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आले.

सर्व प्रथम क्रांतिसूर्य म.ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन व नमन केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, महात्मा ज्योतिबा फुले यांचे अतुलनीय कार्य असून फुले दांम्पत्य मानव कल्याणासाठी झटले असून शिक्षण व प्रामुख्याने स्त्री शिक्षणासाठी एकाकी लढा दिले. तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटले असल्याचे म्हणत फुले दांम्पत्यांचे संघर्षमय जीवन प्रत्येकांनी आत्मसात करून त्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहनही आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

यावेळी श्रीनिवास विरगोनवार, सारिका गडपल्लीवार, शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोने, महेश मोहूर्ले, इरफान पठाण, मखमुर शेख, राजू पडालवार होते.