ग्राम पंचायत बोटनपूंडी अंतर्गत कत्रणगटा ते वटेली जाणाऱ्या रस्तावर पूल होणार जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली मंजुरी, भूमिपूजन सोहळा संपन्न

 

           प्रतिनिधी // इरफान शेख

भामरागड : अहेरी विधानसभेतील रस्त्यावरील लहान पुल बांधकाम करणे याबाबत जिल्हा परिषद जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 3054/5054 निधी मधून फुल (ब्रिज) काम मंजूर करण्यात आले आहे.

या परिसराला दैनंदिन जीवनात नेहमीच प्रत्येक समस्येवर सामना करावा लागतो. कारण या परिसरात आरोग्य,शिक्षण,विद्युत व दळणवळण ईत्यादी समस्यांचा सामना प्रत्येक वर्षी करावा लागतो. या गावाला जाण्यासाठी नाला असुन पुल नाही, गावालगतच नाला असल्याने पावसाळ्यात त्रास होत असतो, हा एकमेव मार्ग आहे व प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी बाहेरच गावाला जावे लागत असते. तालुका स्थळावर शासकीय व खासगी कामासाठी तसेच दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते व त्या ठिकाणी कार्यरत असलेले प्रत्येक कर्मचारी ये जा करतात ते कर्तव्य बजावत असताना कर्मचार्‍यांना सुद्धा दळणवळणचा सामना करावा लागतो.

ऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सदर नाल्याची पाहणी केली होती तेव्हा नागरिकांनी पूल बांधकामाची मागणी केली. गावातील नागरिकांना ये जा करण्यास अडचण होत असल्याने त्यानुसार जिल्हा परिषद कडून 6800000 / रुपये देवून सदर पूल बांधकाम करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आले व बांधकाम होणार आहे. सदर रस्त्यावर जि.प.अध्यक्ष यांच्या हस्ते सदर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी भामरागड चे माजी उपसभापती लालसू आत्राम, बोटनपुंडी सरपंच लचु आत्राम, उपसरपंच छतृ मडावी, पेरमली माजी सरपंच प्रमोद आत्राम, मेडपल्ली सरपंच निलेश वेलादी, देऊ पुंगाटी, जगदीश कोकमुट्टीवा, अतुल मुनगेलवार, सुनील रॉय, मल्ला तलांडे, सैनू आत्राम, माजी नगरसेवक भामरागड, कोरकेजी आत्राम, रमधुकर आत्राम, साधू मडावी, दलसू मडावी, विजय आत्राम, तुळशीराम पुगाटी, राकेश आत्राम, एटापल्ली चे उपविभागीय अभियंता जुवारे व गावातील नागरिक उपस्थित होते.