!!एकोणवीसशे मीटर रस्ता व पुलीया बांधकामास साडे सहा कोटी रुपयांचा प्रशासकीय मान्यता काम प्रगती पथावर!!
प्रतिनिधी // दीक्षा झाडे
चामोर्शी– दिनांक 10 मार्च 2021*येथील चीच डोह येथील लोंढोली नदी घाटावर जाण्यासाठी शहरातील नागरिकांना खूप कसरत करावी लागत होती* *कारण चामोर्शी ते चीचडोह व चीचडोह ते लोंढोली हा एकूण एकोनविसशे मीटर रस्ता खूप दयनीय अवस्थेत होता
कारण खडीकरण केलेला रस्ता संपूर्णपणे उखडला होता सर्वसामान्य शेतकरी व जनतेला या चिखलमय व खड्डे युक्त रस्त्याने जाताना नाकी नऊ यायचे व याच रस्त्यावर चीचडोह येथे पाटबंधारे विभागाच्या वतीने शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला चीचडोह प्रकल्प पूर्णत्वास आल्याने येथे पर्यटक यांची मोठी गर्दी असते
याच रस्त्याने येथील नदी घाटावर समशान भूमी आहे व येथेच मृतकाना जाळले जाते* *व याच रस्त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील हरांबा लोंढोली येथे अतिशय कमी
वेळेत पोहोचता येते
त्यामुळे या रस्त्यावर नेहमी खूप वर्दळ असते हा रस्ता झाला पाहिजे यासाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी गेल्या
दोन वर्षांपासून प्रयत्नशील
होते व आता सदर काम मंजूर होऊन प्रगती पथावर आहे या कामाची पाहणी करण्यासाठी अा,डॉ, होळी यांनी भेट दिली व समस्त कामाची व येथील ब्यारेज ची पाहणी केली* *यावेळी अभियंता प्रमोद कुंभलवार , भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे , ज्येष्ठ नेते जयराम सावकार चलाख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते