शंकर महागु सोयाम यांना जमीन परत करण्याची कार्यवाही करावी- मान. मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नागपूर विभाग यांचे चौकशी आदेश

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

मौजा: बल्लारपूर येथील मुळ भुमापन क्रमांक: 31/59, आराजी 1.62 हे. आर. भुधारी हक्काने मिळालेल्या शेतजमिनीची सखोल चौकशी करुन मुळ मालकास शेतजमिन परत मिळण्याकरिता निवेदन श्री. शंकर महागु सोयाम रा. श्रीराम वार्ड,बल्लारपूर यांनी मान. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे नागपूर येथील कार्यालय यांना दिनांक: 16/09/2020 ला सादर केले होते.

त्यानुषंगाने श्री. सुधाकर तेलंग उपायुक्त( महसूल) तथा मान. मुख्यमंत्री यांचे विशेषकार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, नागपूर विभाग, विभागिय आयुक्त कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर यांनी जावक क्रमांक: मुख्यमंत्री 1252/2020 दिनांक: 16 सप्टेंबर 2020 रोजी मान. जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांना आदेश दिले आहे. व त्यांचे कार्यालयास चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.