31/60 मौजा बल्लारपूर येथील जमीन आरक्षणात आहे असा मान. मुख्याधिकारी, नगर परिषद, बल्लारपूर यांनी लावलेला फलक काढून फेकला

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

मौजा बल्लारपूर येथील 31/60 ही जमीन नगर परिषद, बल्लारपूर कडील विकास योजनेत आरक्षणात आहे. तसे नगर परिषद, बल्लारपूर तर्फे पत्र क्रमांक: 296/2021 दिनांक: 20/01/2021 रोजी माहितीचा अधिकार अधिनियम कायदा-2005 नुसार कळविन्यात आले होते.

गैरअरजदार श्रीमान सुधोष पांडुरंग महेशकर या व्यक्तीने शासनाला गुमराह करून त्या जमिनीवर प्लॉट पाडून विक्री करण्यात येत आहे. करिता योग्य कार्यवाही करण्यात यावी, असे श्री. लक्ष्मण कनकुंटला सचिव मानवाधिकार परिषद, चंद्रपुर ( महाराष्ट्र राज्य) द्वारा दिनांक: 16/03/2021 ला मान. मुख्याअधिकारी, नगर परिषद, बल्लारपूर कडे केली होती.

त्याअनुशंगाने योग्य कार्यवाहीसाठी मान. मुख्याधिकारी, नगर परिषद, बल्लारपूर यांनी दखल घेऊन फलक लावलेला होता, तो दिनांक: 10/04/2021 रोजी संबंधिताने काढून फेकला आहे, असे सकृतदर्शनी निदर्शनात आले आहे. याबाबत श्री. लक्ष्मण कनकुंटला यांनी मान. मुख्याधिकारी नगर परिषद, बल्लारपूर यांना वाटसअप च्या माध्यमातून तक्रार केली आहे.