जिल्हातील चंद्रपूर तालुका निराधार लाभार्थाना लवकरच मिळणार लाभ १५ हजार निराधार लाभार्थांना मिळणार ३ महिन्याचे एकत्रित अनुदान

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक अर्थसाहाय्याच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजने अंतर्गत चंद्रपूर जिल्हातील ग्रामीण तथा शहरी भागातील १५ हजार हून अधिक लाभार्थाना एप्रिल २०२१ यामहिन्यात मागील ३ महिन्याचे एकत्रित अनुदान प्राप्तः होण्याची माहिती तहसीलदार साहेबांनी ब्रिजभूषण पाझारे यांना कार्यालयातील भेटीदरम्यान दिली.

निराधार हे सध्याच्या परीस्थित अतिशय महत्वाचे अर्थ सहाय्य ठरले असून यावर अनेक व्यक्तींचे जीवन सुरु आहे. ज्या व्यक्तीस कोणतेही प्रकारची आर्थिक आवक नाही अशा व्यक्तीना निराधार योजना वरदानच आहे. मागील तीन महिन्यापासून अनुदान थांबले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुषंगघाने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजने चे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्याचे एकत्रित अनुदान लाभार्थाना मिळण्याकरिता भाजपा जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार यांना पत्राद्वारे मागणी केलेली होती. त्यांच्या मागणीस यश प्राप्तः झाल्याचे निर्देशनास येत आहे.