आज 1217 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

 

09 एप्रिल 2021

आज 1217 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

• आज डिस्चार्ज 33

• बरे झालेले रुग्ण 16731

• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 25821

• क्रियाशील रुग्ण 8696

• आज 13 मृत्यू

• एकूण मृत्यू 394

• रिकव्हरी रेट 64.80 टक्के

• मृत्यू दर 01.53

• आजच्या टेस्ट 9220

 

प्रतिनिधी // दीक्षा झाडे

भंडारा, दि.09 :- जिल्ह्यात आज 33 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16731 झाली असून आज 1217 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 25821 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.80 टक्के आहे.

आज 9220 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 1217 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 2 लाख 33 हजार 980 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 25821 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 388, मोहाडी 141, तुमसर 218, पवनी 207, लाखनी 139, साकोली 52 व लाखांदुर तालुक्यातील 72 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 16731 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 25821 झाली असून 8696 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 394 झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.80 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.53 टक्के एवढा आहे.