2 मृत्यूसह आज 219 नवीन कोरोना बाधित 

 

प्रतिनिधी // दीक्षा झाडे

दि.08: आज जिल्हयात 219 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 37 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 124 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज दोन नवीन मृत्यूमध्ये वनश्री कॉलोनी गडचिरोली येथील 53 वर्षीय पुरुष व भामरागड येथील 73 वर्षीय महिला अशा दोघांचा समावेश आहे.

नवीन 219 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 77, अहेरी तालुक्यातील 23, आरमोरी 11, भामरागड तालुक्यातील 30, चामोर्शी तालुक्यातील 6, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 13, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 3, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 12 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 17 व इतर जिल्हयातील बाधितामध्ये 5 जणांचा समावेश आहे.