बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
राज्यात कोरोणाचा प्रकोप दिवसेंदिवस प्रचंड वाढतोय. त्यासाठी कडक निर्बंध लावण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कडक ताळेबंदि मिनी लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामध्ये जिवनावश्यक वस्तुंचे दुकाने ( भाजीपाला, किराणा, मेडिकल) सोडले तर सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या आले आहे.
हातावर पोट असणार्या गोरगरीबांपासुन तर छोट्या छोट्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांच्या जिवाला घोर लागला आहे. अशा परिस्थितीत शासनाने सबंध घटकांचा विचार करून हे निर्बंध शिथिल करावे.
गोरगरिबांचे जिवन व अर्थकारण प्रभावित होणार नाही. असे निर्णय व्हावे. आणि जिल्ह्यातील छोट्या मोठ्या व्यावसायिक दुकानदारांना दुकाने उघडण्यासाठी दिलासा देऊन त्यांच्या भरवशावर असणार्या सामान्य गोरगरीब मोलमजूरांच्या पोटाला हक्काची भाकर मिळेल अशी तजवीज करावी. अशी मागणी बल्लारपूर तहसीलदार मा.संजय राइचवार सर यांना निवेदन मार्फत केली. टाळेबंदी च्या दिवसांत सोसिल डिस्टन्स चा पालन करत बल्लारपूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण नियम पाळून निवेदन दिले. या कार्यक्रमात उपस्थित बल्लारपूर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष श्री. आरिफ शेख सरवर,संजय गांधी निराधार योजना चे सदस्य श्री. गोलुभाऊ उराडे, अंकीत निवलकर ,दीपक जी कालढेल,प्रशांत मांढरे, गौरव पडधरिया,मनीष ब्रमैय्या, सुरेंद्र जी काबरा, नंदू तिलोकांनी, शंकर तिलोकांनी, शैलेश खंडेलवार, नरेश गुप्ता,चंदन तिलोकांनी, अमर जी राहीकवार, राम मिर्गानी, भरत मिर्गानी, गणेश मुपिडवार, मनोज बोकडे, प्रवीण आमटे, मयूर संखवाल, भरत भाटकर,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.