व्यंकटरावपेठा येथे नहर खोलीकरण व मजबुतीकरण कामाचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन  परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय

 

अहेरी तालुका प्रतिनिधी इरफान शेख

अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथे मामा तलाव असुन गेल्या अनेक वर्षापासून नहर (कॅनल) दुरुस्ती करण्यात आले नाही. सदर कामांसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून निधी मंजूर करण्यात आले असून जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमीपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

व्येँकटरावपेठा येथील तलाव मागील अनेक वर्षांपासून नहर(कॅनल) खोलीकरण केले नसल्याने गावातील शेतकऱ्यांना बिनउपयोगी ठरत होते. मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिली असता जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिली होती. जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत व्येँकटरावपेठा येतील नहर खोलीकरण कामासाठी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले.जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा व्यंकटरावपेठा येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

तलावतील पाणी शेतात नेण्यासाटी नहर (कॅनल) च्या माध्यमाने नेण्यात येत होते पण काही वर्षां पासून नहर ची दुरुस्ती केलेली नसल्यामुळे प्रत्येकाच्या शेती उपयोगी कामाकरिता पाणी पोहोचत नसल्यामुळे दुरुस्ती व खोलीकरण करून देण्यात यावी अशी विनंती गावातील शेतकऱ्यांनी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे केल्यामुळे नहर मंजूर करून कामाचे उद्घाटन करण्यात आले. खोलीकरण झाल्यास शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल व पूरकपणे पीक घेण्यास सोईचे होईल.

भूमिपूजन कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, आविस शहर अध्यक्ष प्रशांत गोडशेलवार, जलसंधारण उपविभागीय अभियंता इंगोले, ग्राम पंचायत सदस्या सौ.मीनाताई गरगम, माजी सरपंच संपतराव सिडाम, माजी उपसरपंच स्वामी राऊत, शंकर सिडाम, रवि करमे, ग्रामसेविका कु.मडावी मँडम व नागरिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.