बल्लारपूर ( राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)
मा. कपिल पाटील आमदार यांनी
अनुदानित शाळेतील पगाराबाबत जी चिंता व्यक्त केली त्याच प्रमाणे, विनाअनुदानित कान्वेंट शाळेतील शिक्षकांच्या पगारा बाबत केली असती तर खरच एक शिक्षक आमदार आहात याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटला असता.
परंतु ज्यांचे पोट भरले आहे त्यांच्याच बाबत आपण विचार व्यक्त करत आहात.
मागील अनेक वर्षापासून विनाअनुदानित कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचारी नियमानुसार वेतनापासून वंचित आहेत .
त्यांना कोणतीही सुविधा दिल्या जात नाही.
तरी ते इमानेइतबारे आपले काम प्रामाणिकपणे करीत असून, समाजात, शैक्षणिक क्षेत्रात उत्तम विद्यार्थी व नागरिक घडवीत आहे.
परंतु त्यांना तुटपुंजा पगार देऊन संस्थाचालक त्यांची बोळवण करीत असून सरकारही याकडे दुर्लक्ष करीत आहे .
मागील कोरोना च्या एक वर्षापासून अनेक शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नसून त्यांचे कुटुंब कसे जगत असतील याची चिंता हि आपल्याला नाही याबाबत एक शिक्षक म्हणून व आपण एक शिक्षक आमदार म्हणून वाईट वाटते.
याबाबतचे अनेक निवेदने सरकार दरबारी जमा असून याची जाणीवही आपणाला आहे. तरीपण आपण या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष न देता आपले संकुचित विचार फक्त अनुदानित शाळेतील शिक्षकांसाठी मर्यादित ठेवले आहे. हे फार निषेधार्थ आहे.
एक शिक्षक आमदार म्हणून आपण राज्यातील सर्व शोषित, पीडित, अन्याय ग्रस्त शिक्षकांना लवकरात लवकर कसा न्याय मिळवून देता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.
याबाबत वेळोवेळी आपण संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना निर्देश देऊन कान्वेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा करतो. अशी मागणी श्री.विवेक आंबेकर चंद्रपूर अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक-पालक एकता मंच चंद्रपूर यांनी केली आहे.