शिक्षकांच्या वेतनाबाबत अधीक्षक यांचे सोबत बैठक

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

जि. प. माध्यमिक शिक्षण विभाग चंद्रपूर चे श्री संजय बोदाडकर, अधीक्षक वेतन व भविष निर्वाह निधी पथक यांच्या सोबत जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतन संदर्भात प्रलंबित असलेल्या विषयावर बैठक झाली व सविस्तर चर्चा करण्यात आली, नव्याने 20 टक्के अनुदानावर आलेल्या शाळांच्या वेतनाचा प्रश्न अधीक्षक श्री बोदाडकर यांनी पाठपुरावा करून तातडीने सोडविल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी श्री उमाकांत धांडे, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, प्राचार्य नरेंद्र बोबडे, अध्यक्ष चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .