आलापल्ली शहर प्रतिनिधी दीक्षा झाडे
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम साजरे न करण्याचे आव्हान
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे तसेच राज्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाने कठोर निर्बंध जाहीर केले आहे. यात प्रामुख्याने जमावबंदी लागु करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर उद्या दि. 6 एप्रील रोजी साजरा होणारा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस भाजपा पदाधिकारी व कार्यकत्यांनी अतिशय साधेपणाने साजरा करावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी केले आहे
दि. 6 एप्रील रोजी भाजपाचा स्थापना दिवस साजरा करताना कोणतेही गर्दी निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करू नये. आपल्या घरासह भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणा-या प्रत्येक नागरिकाच्या घरावर भाजपाचा झेंडा लावावा व शुभेच्छा दयाव्या असे आ.डॉ देवराव होळी यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंध तसेच शनिवार व रविवारी लॉकडाउन जाहीर करताना विरोधी पक्षाने सुध्दा सहकार्याचे आवाहन केले होते. त्या आव्हानाला पाठिंबा देत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये असे निर्देश भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे यांनी सुद्धा दिले आहे त्यांनी म्हटले आहे