केंद्र पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत तुकूम व टागोर शाळा प्रभागातील पाणी टाक्यांचा शुभारंभ  पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे व्दारा महापौर, पूर्व महापौर, सभापती, नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक व सन्मान

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून साकारलेली केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत महानगरांसाठी राबविण्यात येणाÚया लोकहितकारी व अत्यंत महत्वकांक्षी योजनेस चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात आली असुन एकुण 16 टाक्यांचे झोननिहाय धकाम सुरू करण्यात आले असुन यापैकी झोन क्रं. 1 तुकूम व झोन क्रं. 10 टागोर शाळा येथील पाण्याच्या टाकीचे शुभारंभ झाले असुन उर्वरित टाक्यांची कामे तसेच अन्य कामे युध्दपातळीवर जलदगतीने सुरू असल्याने पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 05 एप्रील रोजी चंद्रपूर महागरपालिकेच्या विद्यमान महापौर व उपमहापौर राखीताई कंचर्लावार, राहुल पावडे तसेच पूर्व महापौर व उपमहापौर अंजलीताई घोटेकर, अनिल फुलझेले, गटनेता वसंता देशमुख, स्थायी समितीचे रवि आसवानी, नगरसेवक व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाÚयांचे कौतुक करीत उर्वरित कामे या वर्षात पूर्ण करून महानगरातील नागरीकांना न्याय द्यावा अशी भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थितांचे पुष्पहार घालुन स्वागत केले.

आपल्या संसदीय कार्यकाळात हंसराज अहीर यांनी केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत चंद्रपूर महानगरात पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे 2018 मध्ये 234.95 कोटी रू. किमतीच्या आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. या निधीमध्ये केंद्र शासन, राज्य शासन व महानगपालिकेचा हिस्सा असुन या योजनेसाठी केंद्र शासनाने 113.98 कोटी रू. निधी उपलब्ध केला होता, राज्य शासनाने 56. 99 कोटी रू. तर महानगरपालिकेने 56.99 कोटी निधीचा वाटा दिला असे एकुण 227.96 कोटी निधी या योजनेसाठी प्राप्त झाले असुन आत्तापर्यंत या योजनेच्या विविध विकासकामांवर 203.04 कोटी खर्च झलेला आहे. अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली ही कामे 95 ते 98 टक्याचे आसपास पूर्ण झाली आहेत. 8 पाण्याच्या टाकीचे बांधकाम 94 टक्के पूर्ण झाले आहेत.

या महत्वकांक्षी योजनेमुळे महानगरातील बाबुपेठ, बंगाली कॅम्प , महाकाली आदी टंचाईग्रस्त भागातील नागरीकांना पिन्याचे पाणी मिळणार आहे.