वीजबिल माफी जाहीर न केल्यास मुख्यमंत्री निवासाबाहेर सत्याग्रह :  आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली 

 

जिल्हा प्रतिनिधी // शुभम खरवडे

 

कोविड-१९ महामारी दरम्यान लॉकडाऊनमुळे राज्यातील जनतेची परिस्थिती फारच

बिकट होती आणि आजपर्यंत जनता यामधून बाहेर पडलेली नाही. मागच्या

महिन्यापासून अनेक जिल्ह्यामध्ये लॉकडाउन होते आणि काल पुन्हा आपण

राज्यात लॉकडाऊन घोषित केले आहे. असे असतांना सरकारने बिल न भरू शकलेल्या

जनतेची वीज जोड़नी कापण्यास सुरवात केली आहे. अजून जनजीवन सुरळीत झालेले

नसतांना, पुन्हा लॉकडाऊन सुरु झाले असतांना सरकारने संवेदनशीलता दाखवत

*लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी जाहीर करावी अन्यथा आम आदमी पार्टी जनतेला

फसवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर येत्या 19 तारखेला सत्याग्रह

करेल, असा जाहीर इशारा आम आदमी पार्टीचे राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी

दिला आहे*.

 

 

 

ही मागणी करीत असताना *शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे ३०० यूनिट पर्यन्त

३०%* दर कमी करण्याचे आश्वासन आणि *काँग्रेस – राष्ट्रवादीच्या

शपथनाम्याप्रमाणे औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक*

ठेवण्यासाठीचे आश्वासन याची आठवण आम आदमी पार्टीने करून दिली आहे.

महाराष्ट्रातील वीजदर देशात सर्वात जास्त असल्याने ते कमी केले तर जनतेला

निश्चित दिलासा मिळू शकतो.

 

 

 

जनतेला वीज बिल सवलत देऊन दिवाळी गिफ्ट देऊ असे सांगणाऱ्या सरकारने विशेष

करुण ऊर्जामंत्री व मुख्यमंत्री यांनी हा मुद्दा अधिक न ताणता आर्थिक

कोंडी झालेल्या सामान्य घरगुती मीटर धारकांना आणि शेतकऱ्यांना सवलत

द्यावी. नोव्हेंबर मध्ये काढलेल्या आदेशाप्रमाणे ‘सध्या हप्ते बांधून देत

आहोत’ असे सरकार तर्फे सांगितले जात आहे, परंतु सरकार त्यावर व्याज

आकारणी एकूणच याचा कुणालाही फायदा झालेला नाही. आता पुन्हा लॉकडाऊनचे

सुरु झाले असल्याने ही व्याज आकारणी म्हणजे सरकारची सावकारी पद्धतीने

वसुली ठरते आहे.

 

मध्यंतरी विधानसभेत चर्चा होईपर्यंत वीज तोडणी थांबवण्यात येत असल्याची

घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली होती आणि पुन्हा लगेचच

यु-टर्न घेतला. काही शहरात लॉकडाउन असून सुद्धा विज तोड़नी चालू आहे,

यामध्ये आम आदमी पार्टी जनतेला सहकार्य करुण विज जोड़नी करीत आहे, अशा

परिस्थिति मध्ये विज कंपनी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुण इंग्रजी

राजावटीची आठवण करुण देत आहे.

 

मागच्या मार्च पासून राज्यातील शेतकरी सुद्धा लॉकडाउन आणि आसमानी संकटात

अडकला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आनलेली योजना फसवी आहे, कुणीही शेतकरी

आता रक्कम भरूच शकत नाही, त्यामुळे त्यांना पूर्ण माफी देने गरजेचे आहे.

एकूणच आता मात्र जनतेच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. *त्यामुळेच १५ दिवसात

सरकारने वीजबिल सवलतीचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा आम आदमी पार्टी

राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर सोमवार

दि १९ एप्रिल २०२१ रोजी सत्याग्रह* करतील असे रंगा राचुरे यांनी म्हंटले

आहे.

 

मा उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलेले ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचनपूर्ती सोबतच

 

कोविड दरम्यानचे मार्च ते ऑगस्ट या महिन्याचे २०० युनिट वीज बिल माफी

करावी, मार्च २०२० ते मार्च २०२१ या काळातील थकीत विजबिलावर कोणतेही

व्याज आकारू नये. थकीत बिल असलेल्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येवू नयेत,

शेतकऱ्यांना सरसकट विजबील माफी करावी, वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात

यावे, दि. १ एप्रिल २०२० पासून केलेली वीज दर वाढ मागे घ्यावी आदी

मागण्या आम आदमी पार्टी ने केल्या आहेत. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री

ठाकरे यांना सत्याग्रहाचा इशारा देणारी निवेदने आप तर्फे जिल्हाधिकारी

यांच्या माध्यमातून राज्यभरातून देण्यात आली आहेत.

 

आज जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे

यांच्या नेतृत्वात मा. जिल्हाधिकारी गडचिरोली

यांना निवेदन देण्यात आले, या वेळी. जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे. कोषाध्यक्ष संजय जीवतोडे. युवा संयोजक अनिल बाळेकरमकर. सदस्य कलीदास मेश्राम. सदस्य कमलेश कोडापे. सदस्य संतोष सोनटक्के. सदस्य बाळू जगताप. सचिव संजय भाऊ वाळके. सदस्य रूपेश सावसाकडे. सदस्य हितेंद्र गेडाम

उपस्थित होते.