जनता हायस्कूल ( डेपो शाखा बल्लारपूर )येथे इयता 10 वी च्या विद्यार्थांना निरोप

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

दिनांक: 05/04/2021 रोजी जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर येथे एका कार्यक्रमाद्वारे इयता 10 वी च्या विद्यार्थांना निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. ए. बी. बघेल मुख्याध्यापक, प्रमूख पाहुने श्री. बी. पि. चिकाटे माजी सेवानीवृत मुख्याध्यापक, श्री. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, श्री. एस. बी. धांडे वर्ग शिक्षक 10 वी यांची उपस्थिती होती.

प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे फोटोला माल्यारपन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

10 वी चे विद्यार्थी कु. वैश्ण्वी हजारे, कु. दिक्षा वांढरे, कु. साध्वी घुबडे, कु. वैष्णवी मुलकावार, कु. अपर्ना मोड्क, निखील काकडे, सुरज उइके आदी विद्यार्थी यांनी आपले अनुभव सांगितले. श्री. यु. के. रांगनकर सर यांनी दहावीच्या परिक्षेची माहिती दिली.

यावेळी श्री. एस. बी. धांडे सर, श्री. एम. डी. टोंगे सर, श्री. बी. पि. चिकाटे सर यांनीही मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. ए. बी. बघेल सर यांनी दहावी परिक्षेचे महत्व कथन केले.

प्रास्तविक व संचालन कु. एस. एस. काळे मॅडम व आभार सौ. एस. एन. लोधे मॅडम यांनी मानले. शेवटी अल्पोपहार देन्यात आला. कार्यक्रमात शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थीत होते.