ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांचा आदर्श घ्या   निरीक्षण अधिकारी संघपाल मेश्राम:- निसर्ग सखा च्या वतीने भोयर यांचा सत्कार

 

गोंडपिपरी:-तालुका प्रतिनिधी निकेश बोरकुटे

गोंडपिपरी : गावाच्या विकासासाठी समन्वयाची भुमिका आवश्यक असते.सरपंच पदाधिकारी व शासनाचे प्रतिनीधी यांनी योग्य मेळ साधला कि,गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो.मुल तालुक्यातील मारोडा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांनी अतिशय समन्वयाने गावाचा विकास साधला.त्याच्या कार्याची दखल सरकारने घेतली.त्यांना नुकताच राज्य शासनाने आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार घोषित केला.विलास भोयर यांचा आदर्श घेत ग्रामसेवकांनी गावविकासाचे नियोजन करावे असे प्रतिपादन गोंडपिपरीचे निरीक्षण अधिकारी संघपाल मेश्राम यांनी केले.

गोंडपिपरी येथील निसर्ग सखा संस्थेच्या वतीने गोंडपिपरीचे भुमीपूत्र व मारोडयाचे ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.गोंडपिपरीचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले,सत्कारमुर्ती विलास भोयर,जेष्ट पत्रकार संदीप रायपूरे,चेकघडोलीचे संरपच पोचमल्लू उलेंदला अदि मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

मुल तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विलास भोयर यांना नुकताच राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला.वैयक्तीक पुरस्कारासोबतच त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीला केंद्र व राज्य शासनाचे पुरस्कार मिळवून दिले.विलास भोयर हे मुळचे गोंडपिपरीचे भुमीपूत्र आहेत.त्यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून गोंडपिपरी,पांेभुर्णा,राजूरा व मुल तालुक्यात एकून 27 वर्ष सेवा दिली.आपल्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी अतिउत्कृष्ट कामगिरी केली.त्यांच्या या कामगीरीची दखल घेत प्रशासनाने त्यांना पुरस्कार देत गौरवान्वीत केले.

तालुक्यातील भुमीपूत्राला हा सन्मान मिळाल्याने निसर्ग सखा संस्थेच्या वतीने त्यांचा एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देउन त्यांना गौरविण्यात आले.यावेळी सत्काराला उत्तर देतांना भोयर यांनी विकासकामांच्या नियोजनांची माहिती दिली.निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दिपक वांढरे यांनी प्रास्ताविक,बेंबाळ चे ग्रामविकास अधिकारी आशिक सुखदेवे यांनी संचालन तर आकाश चैधरी यांनी आभार मानले.कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी किर्तीमंत मंगर,देवेद्र बांबोडे,सत्यवान सुरपाम,संतोष खोब्रागडे,विनोद दुुर्गे यांच्यासह संस्थेच्या सभासदांची उपस्थिती होती.