चकमकीत तब्बल १९ पोलीस जवान शहीद तर १५ हून अधिक नक्षली ठार झाल्याची शक्यता !

 

दीक्षा झाडे आलापल्ली शहर प्रतिनिधी 

 

छत्तीसगड. काल छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात पोलीस_नक्षल मध्ये चकमक झाली होती. याच्या चकमकीत ५ जवान शहीद झाले होते तर ३० हून अधिक जवान जखमी झाले. मात्र या पोलिस पथकातील २१ जवान अद्याप बेपत्ता असल्याची माहिती छत्तीसगड पोलीस प्रशासनाने दिली होती आणि बेपत्ता असलेल्या पोलीस जवानांना शोधण्यासाठी मोहीम राबवली गेली. दरम्यान आज १४ जवानांची मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय च्या माहितीनुसार काल चकमक झाली त्याच परिसरात आणखी 14 जवानांचे मृतदेह आढळून आले.

त्यामुळे आता या नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या आकडा १९ वर पोचला आहे.

या चकमकी वेळी घटनास्थळी २०० हून अधिक नक्षलवादी उपस्थित होते. या घटनेत जखमी जवानांना बाहेर काढण्यासाठी दोन एमआय १७ हेलिकॅप्टर आणण्यात आले होते. जखमी झालेल्या जवनामधील २३ जणांना बिजापूर तर ७ सात जणांना रायपूर मधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा दलाचा असा दावा आहे, या चकमकीत पंधराहून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत.