BS-4-राष्ट्रीय अभियान खेड्यां कडे-साव सर

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, आणि संवंर्धन या राष्ट्रीय अभियानांतर्गत मुर्ती गाव, तह. राजुरा येथे दिनांक: 30/03/2021 रोजी अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी मा. एम. टी. साव, मा. जि. के. उपरे, पीपीआय-डी, दिवाकर मडावी बामसेफ उपस्थित होते. मा. साव सर यांनी, त्यांना संविधानामुळे देशातील नागरिकांचे अधिकार सुरक्षित करून देण्यात आले. त्यात महिला 50% असुन त्यांच्या साठी विशे कायद्याची तरतुद, स्त्रिपुरुष समानता, वडिलांच्या संपत्ती मध्ये वाटा व समता, स्वतंत्र, बंधुत्वाचे अधिकार निहित आहेत. परंतु संविधानाची अंमल बजावणी न झाल्याने न्यायापासुन कोसो दुर असल्याचे सांगितले.

मा. निळाबाई रामटेके, मा. मेवंता देवगडे, मा. वनिता देवगडे, मा. कुंदा अलोने, मा. चंद्रकला देवगडे, मा. सईबाई पिपरे इत्यादी महिला उपस्थित होत्या.