बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)
दि. 3 एप्रिल रोजी सकाळी सिंदेवाही तालुक्यातील शिवनी जंगल परिसरात श्रीधर आत्राम वय 55 यांच्यावर वाघाने हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या बाबीची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ग्रामपंचायत सिरकाळा येथे जाऊन मृतकाच्या परिवाराची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. पालकमंत्री यांनी मृतकाच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली तसेच वनविभागामार्फत देखील तातडीने शासकीय मदत देण्यात आली आहे.