स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर तर्फे सायबर सेल चंद्रपुर यांचे मदतीने बँक डकैती व एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

 

य बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी सायबर सेल चंद्रपुर यांचे मदतीने बँक डकैती व एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करुन उत्तरप्रदेशातुन 2 आरोपीसह 1.7 कोटी रुपयाचे सोने व रोख रक्कम जप्त केली. सदर आरोपी शोध कामी स्थानिक गुन्हेंशाखेचे २ पोलीस अधिकारी व 9 पोलीस अंमलदार यांनी मोठया शिताफीने व जिवाची बाजी लावुन आरोपींना अटक केली. याकामी उत्तर प्रदेशातील स्थानिक पोलीस पथकाने यांनी मोलाची मदत केली.