श्री. अनिल दौलतराव काकडे यांना अनधिकृतरित्या अभिन्यास पाडून भूखंडाची विक्री प्रकरणी नगर पालिका, बल्लारपूर चा नोटीस श्री. निशांत आत्राम, नगरसेवक यांनी नगर पालिका, बल्लारपूर ला सादर केली तक्रार

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

 

मौजा: बल्लारपूर येथील सर्वे क्रमांक: 31/94 मधे अनधिकृतरित्या अभिन्यास पाडून भूखंडाची अवैधरित्या विक्री करन्याबाबतची तक्रार श्री. निशांत आत्राम, नगरसेवक यांनी, मान. मुख्याधिकारी, नगर पालिका, बल्लारपूर ला केली.

नगर पालिका, बल्लारपूर यांनी प्रत्यक्ष मौका पाहणी केली असता श्री. अनिल दौलतराव काकडे यांनी या जागेवर अनधिकृतरित्या प्लॉट पाडून त्याची विक्री करुन सर्वसामान्य जनतेची फसवणुक केल्याचे निदर्शनात आले.

यासाठी मान. मुख्याधिकारी, नगर पालिका, बल्लारपूर यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जा. क्र./ नपब/ योजना विभाग/ 1252/2021 दिनांक: 30/03/2021 रोजी त्यांना नोटिस बजावून खुलासा सादर करण्यास व शासन परवानगी घेऊन अभिन्यास मंजुरीची रीतसर कार्यवाही करण्यास सांगितले आहे.