छत्तीसगडमधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ रुग्णांचा मृत्यू  

 

 

प्रतिनिधी // अंकुश पूरी

रायपूर : छत्तीसगडमध्ये एका कोविड रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर सर्व रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका कोविड रुग्णालयाला आग लागली. या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 4 रुग्णांपैकी तीन रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह होते. आग लागल्यांतर धुरामुळे तीन रुग्णांचा गुदमरून तर एका रुग्णाचा होरपळून मृत्यू झाला आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजनवर होते, त्यांना तातडीने दुसर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राजधानी रायपुर के टिकरापारा स्थित एक निजी अस्पताल में आज लगी आग से 4 लोगों की मृत होने की सूचना मिली है। प्रदेश के मुख्यमंत्री श्री भूपेश बघेल ने इस घटना को बेहद दुर्भाग्यजनक बताया है । उन्होंने शोक संतप्त परिवार के परिजनों के प्रति अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त की है ।

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नाने ही आग विझवली. अधिकाऱ्य़ांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात 34 कोरोना संक्रमित रुग्ण होते. ज्या वॉर्डमध्ये आग लागली, त्या वॉर्डमध्ये 9 रुग्ण होते. आग लागल्यानंतर तत्काळ सर्व रुग्णांना तिथून हलवण्यात आले.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ही घटना अतिशह दुःखद असल्याचे म्हटले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे.