दुसरी लाट ठरतोय घातक : १ ते ५ वयोगटातील बालकांमध्ये वाढले संसर्गाचे प्रमाण  

 

 

प्रतिनिधी // अंकुश पूरी

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रसारमोठ्या प्रमाणात वाढला आहेत. देशात आता दररोज कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 2 लाखाच्या पार जात असल्याचं चित्र आहे. अशात आता डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण अधिक आहे. विशेषतः 1 ते 5 या वयोगटातील लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक होत असल्याचं चित्र आहे. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचं म्हणत बालरोग तज्ञांनी म्हटलं, की नवजात आणि तरुणांमध्ये कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव आढळून येत आहे.

सर गंगा राम हॉस्पिटलचे बालरोग चिकित्सक डॉक्टर धीरन गुप्ता म्हणाले, की 2020 च्या तुलनेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या लहान बाळांच्या संख्येत पाच पटीनं वाढ झाली आहे. यावेळी अनेक लहान किंवा नवजात बाळ कोरोनाच्या विळख्यात आल्याचं चित्र आहे, असं एलएनजेपी रुग्णालातील आपात्कालीन विभागाच्या प्रमुख डॉक्टर रितू सक्सेना यांनी सांगितलं.

सक्सेना यांनी सांगितलं, की कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून 7 ते 8 बालकं रुग्णालयात अॅडमिट झाले. याशिवाय 15 ते 30 या वयोगटातील तरुणांमध्येही यावेळी कोरोनाचा प्रसार अधिक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शनिवारी देशात कोरोनाचे 2,61,500 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 1501 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1 कोटी 28 लाख 9 हजार 643 इजण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, सध्या 18 लाख 1 हजार 316 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.