
प्रतिनिधी //दीक्षा झाडे
अहेरी – एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह काढण्यासाठी पुन्हा एकदा लॉयड्स अँड मेटल कंपनीने स्थानिक नागरिक व नक्षलाच्या विरोध असून सुद्धा, पुन्हा खनिज काढण्याची तयारी सुरु केली आहे. खनिज उत्खनन करण्याकरिता नक्षल आणि त्या भागातील ग्रामसभा यांचा कामाला विरोध पाहता आदिवासी आणि इतर कामगारांच्या जीवाची जबाबदारी कंपनीने घेतली नाही , सदर कंपनीने हाथ वर केले आहेत व संबंधित कपनी कर्मचा-याकडून आदिवासी बेरोजगारांच्या कडून हमीपत्रामध्ये माहिती लिहून घेत आहे. याबाबत काही कमी जास्त झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न शिवसेने चे तालुका प्रमुख (ग्रामीण) सुभाष घुटे यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केलेला आहे.
कंपनी ने लिहिलेल्या अटी व शर्तीमध्ये आपल्याला नक्षलग्रस्त भाग आणि येथील परिस्थिती जाणीव असून जीवाचे काही कमी झाल्यास कंपनीला जबाबदार धरले जाणार नाही, असे नमूद आहे. यासंदर्भात कुटुंबातील वरिष्ट सदस्यांचा सहीने एक वेगळे हमीपत्र लिहून घेतले जात आहे. या अटीमुळे कामगारांचा जीवितास काही झाले तर त्यांचे कुटुंबाला कोणताही मोबदल्या कपनीकडे मागू शकणार नाही. मग याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण होतो. सुरजागड लोह खानिज आदिवासी कामगाराच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची ? आदिवासी युवकांची फसवणूक केली जात आहे. कामगार कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन होत आहे. तरी आपण या विषयाकडे जातीने घालून त्या आदिवासी बेरोजगारांना न्याय मिळवून दयावा अशी सुभाष घुटे यांनी पालकमंत्रींना दिलेल्या निवेदनात विनंती केले आहे