मौजा निर्ली येथील दलित वस्ती नाली बांधकाम नियमानुसार करण्यात यावे

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

मौजा निर्ली येथील दलित वस्ती मधे नाली बांधकाम हे अधिकृतपने श्री. मारोती दुबे, श्री. प्रविण दुबे ते श्री. पंकज दुबे यांच्या घरापर्यंत मंजूर आहे. गावातील नालिचे बांधकाम श्री. प्रवीन दुबे च्या घरापासून ते श्री. प्रदीप दुबे च्या घरापर्यंत आणून सोडण्यात आले आहे. पुढील बांधकाम श्री. नीलकंठ दुबे यांच्या घरापासून आहे, परंतु त्यांचे वालकम्पाऊण्ड नालिच्या जागेवर असल्यामुळे ते नाली बांधकाम मधे अडथळे आनत आहे. त्यांचा अडथळा आनने या मताशी ग्रामपंचायत चार्ली चे सरपंच यांचे सहमत आहे. परंतु त्यांचे मताशी निर्लीवासिय सहमत नाही.

तरी समस्त गावकरी मंडळी च्या वतीने निवेदन मान. सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, चार्ली पंचायत समिती, राजूरा जिल्हा: चंद्रपुर, मान. संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, राजुरा, मान. अभियंता पंचायत समिती राजुरा यांना श्री. संतोष धांडे, श्री. प्रदिप दुबे, श्री. विनय धांडे, श्री. सुनिल जीवतोडे, श्री. बी. एस. उमरे यांनी दीले आहे.